मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने बुधवारी वर्तविली.
पुण्यात बुधवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले होते. पुढील दोन दिवसांमध्ये आकाश निरभ्र राहून कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाजही वर्तविला आहे.
येथे होणार अवकाळी पाऊस
- शुक्रवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा.
- शनिवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ.
- रविवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ.