डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष लेख - अवश्य वाचा.
Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष लेख - अवश्य वाचा.

Top Post Ad

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष: म्हणून गांधीजींना भेटून आंबेडकर खूष झाले....!!!!

>> प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. अशा महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती.

>> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या नात्यात एक अढी होती असेच नेहमी सांगण्यात आले आहे. परंतू गांधीजींनी नेहमी आंबेडकर यांच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा केली आहे. डॉ आंबेकर जेव्हा समाजरचनेवर टिका करत तेव्हा गांधीजी नेहमी असे म्हणत की, 'बोलू द्या आंबेडकरांना त्यांना हक्क आहे आपल्या ला बोलण्याचा कारण आपल्यामुळेच नेहमी त्यांच्या समाजाला कष्ट झेलावे लागले आहे.'

>> अखेर तो दिवस उजाळला जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुणे करार दरम्यान गांधीजींना भेटले. सप्टेंबर महिन्यात पुण्याच्या येरवदा कारावास येथून संपूर्ण जगभरासाठी एक महत्त्वाचा निरोप मिळणार होता. डॉ. आंबेडकरांची मागणी होती सर्व दलितांच्या अडचणी सोडवण्यासाठी एक वेगळा कायदा निघावा. गांधीजींना ते पटत नाही होतं, बैठकी दरम्यान दोघांचं एका पर्यायावर एकमत झालं. बैठकी नंतर गांधीजी आणि आंबेडकर हसत हसत खोलीतून बाहेर पडले. खोलीच्या बाहेर कस्तुरबा बसल्या होत्या . कस्तुरबा नेहमी गांधीजी आणि आंबेडकरांच्या संबंधावर चर्चा करत असत त्यांना नेहमी वाटायचं की दोघांनी एकमेकांच्या विचारांचा आदर करत सोबत चालावं.

>> आंबेडकरांना जातांना पाहिलं आणि कस्तुरबांनी विचारलं ,'तुम्हाला जे हवं होतं ते भेटलं का डॉ. साहेब?' डॉ आंबेडकर हसत म्हणाले, 'बा जे हवं होतं ते तर नाही मिळालं मात्र जे भेटलं आहे ते अपेक्षेपेक्षा जास्त आहे.' मग कस्तुरबांनी विचारलं 'तुम्ही आनंदी तर आहात ना डॉ. साहेब ?' डॉ आंबेडकर म्हणाले, 'हो बा मी खुश आहे.' कस्तुरबा सोबत डॉ आंबेडकरांचे संवाद कमी असले तरी त्यात आपलेपणा होता. जो कोणी महापुरुषांचा खरा सम्मान आणि आदर करतात त्यांना माहीत आहे की ही दोघेही समाजातल्या वाईटाला संपवायचा प्रयत्न करत होते. जरी त्यांचे मार्ग वेगवेगळे असले तरी ते लढत होते. डॉ आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेचा आदर करत गांधीजींनी त्यांना कायदे रुजवायला सांगितले. ज्याचा परिणाम आपल्या समोर आहे, 'भारतीय संविधान.'


Below Post Ad