◆♀ कोरोनासाठी सरकार ची सामान्यांसाठी जन आरोग्य योजना - वाचा अधिक
Type Here to Get Search Results !

◆♀ कोरोनासाठी सरकार ची सामान्यांसाठी जन आरोग्य योजना - वाचा अधिक


💁‍♂️  कोरोनाचं संकट वाढतंय ! - महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती तुमच्याकडं आहे का ?

🧐  कोरोनावरील उपचार घेताना अनेकांना रुग्णालयात उपचाराचा खर्च भागवणं कठीण जाते - अशावेळी आपल्याला महात्मा फुले जन आरोग्य योजनेविषयी माहिती असणे - नक्कीच फायद्याचे ठरते 

💰 मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऐनवेळी कागदपत्रांची तडजोड करण्यासाठी धावपळ करावी लागते -  ही धावपळ होऊ नये यासाठी - हि माहिती व्यवस्तीत समजून घ्या 

💁‍♂️  या योजनेबद्दल थोडी माहिती ? -  या योजनेअंतर्गत राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी  नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ मिळतो -  या अंतर्गत राज्यातील कुटुंबाला प्रति कुटुंब - प्रति वर्ष 1.50 लाख रुपया पर्यंतचे विमा संरक्षण मिळते - महत्वाचे म्हणजे या योजनेत कोरोना वरील उपचारांचा देखील समावेश करण्यात आला आहे 

📣 लाभ कोण घेऊ शकते ? - राज्यातील पिवळी शिधापत्रिकाधारक , अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी शिधापत्रिका धारक - कुटुंबातील सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकता - तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे - तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील - शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबं देखील या योजनेचे लाभ घेऊ शकतात 

🧐  या योजने अंतर्गत तुमच्या जवळचं रुग्णालय कसं शोधणार? -  यासाठी jeevandayee.gov.in या योजनेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर , Network Hospitals या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्ही DistrictWise Hospital - किंवा कोणत्या प्रकराचा उपचार घ्यायचा आहे , त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील , या योजनेशी संलग्नित रुग्णालयाची माहिती घेउ शकता 

✍️  पेशंट ची नोंदणी कुठं करावी ? -  या योजनेअंतर्गत हा लाभ घेण्यासाठी रुग्णालयात असणाऱ्या आरोग्य मित्रांची मदत घेता येते ,आरोग्यमित्र रुग्णाची योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणी करतात - तसेच रुग्णालयात उपचार घेतांना योग्य ते सहाय्य व मदत करतात - दरम्यान रुग्ण नोंदणीच्या वेळी रुग्णाच्या नावाची पडताळणी ,आणि त्याचे ओळखपत्रे  सुद्धा पाहली जातात 

🤔  ओळखपत्र म्हणून कोणता पुरावा लागतो?- महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र, -  शिधापत्रिका तसेच छायाचित्रासह असणारे ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना, - याव्यतिरिक्त आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि 7/12 उतारा आवश्यक आहे 

🙏  जन आरोग्य योजनेबबद्दलची - हि माहिती नागरिकांसाठी नक्कीच ,खूप महत्वाची आहे , आपण थोडा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा 

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section