५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका; निवडणूक आयोगाची आज बैठक
Type Here to Get Search Results !

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका; निवडणूक आयोगाची आज बैठक

नवी दिल्लीः येत्या काही महिन्यांत ५ राज्यांच्या (तामिळनाडू, आसाम, पुदुच्चेरी, केरळमधील आणि पश्चिम बंगाल ) विधानसभा निवडणुकांची ( assembly election 2021 ) तयारी अंतिम टप्प्यात आहे. निवडणूक आयोगाने ( election commission ) आज सकाळी ११ वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीत ५ राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक निश्चित केले जाईल.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ ही राज्ये आणि पुदुच्चेरी या एका केंद्र शासित प्रदेशात विधानसभा निवडणुकांची तयारीचा खाका निवडणूक आयोगाने तयार केला आहे. आता आज सकाळी ११ वाजता निवडणूक आयोगाने यासंदर्भात बैठक बोलावली आहे. या बैठकीत ५ राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक निश्चित केले जाईल, असं सांगण्यात येत आहे. यानंतर निवडणूक आयोग लवकरच निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार आहे.केंद्रीय सुरक्षा दलाच्या २५० कंपन्यांची तैनाती- निवडणूक आयोगासोबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर केंद्र सरकारने निवडणुका होणाऱ्या ५ राज्यांमध्ये केंद्रीय निमलष्करी दलाच्या २५० कंपन्यांची तैनाती सुरू केली आहे. या कंपन्यांमध्ये केंद्रीय राखीव पोलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल आणि इतर सुरक्षा दलातील जवानांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये १२५ कंपन्या पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय तामिळनाडूमध्ये, ४५, आसाममध्ये, ४०, पुदुच्चेरीत १० आणि केरळमध्ये ३० कंपन्या तैनात केल्या जणार आहेत.ज्या ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत ते एकही हिंदी भाषिक राज्य नाही. यातील सर्वात मोठी निवडणूक पश्चिम बंगालमध्ये आहे. याशिवाय या निवडणुकीबरोबर आसाम, पुडुचेरी, तामिळनाडू आणि केरळमध्येही निवडणुका होणार आहेत. या सर्वांच्या निवडणुक होण्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या पथकाने येथे भेट दिली आणि कायदा व सुव्यवस्थेसह इतर गोष्टींची माहिती घेतली.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section