कोरोनाचा कहर; महाराष्ट्र, केरळासह सहा राज्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण.
Type Here to Get Search Results !

कोरोनाचा कहर; महाराष्ट्र, केरळासह सहा राज्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण.

 

कोरोनाचा कहर; महाराष्ट्र, केरळासह सहा राज्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण.


 ◆ संपूर्ण देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्र, केरळासह देशातील सहा राज्यात कोरोनाचा कहर निर्माण झाला आहे. त्यामुळे या सहाही राज्यांतील आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.


 ◆ महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात कोरोनाचे रुग्ण आढळल्याचं दिसून आलं आहे. या राज्यांमध्ये वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या सहाही राज्यांमध्ये 86.69 टक्के नव्या केसेस समोर आल्या आहेत. त्यात महाराष्ट्र आणि केरळात एकूण 75. 87 टक्के सक्रिय रुग्ण असल्याचं दिसून आलं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात कोरोनाचा दर 97.27 टक्के असून मृत्यू दर 1.42 टक्के आहे. देशात 1 लाख 43 हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.


 ◆ मुंबईत कोरोना वेगाने पसरत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने झाडाझडती सुरू केली आहे. महापालिकेने आतापर्यंत 1305 इमारती सील केल्या आहेत. या इमारतीत 71 हजार 838 कुटुंब राहतात. मुंबईत 2749 केसेस आढळल्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांपूर्वीच पालिकेने कोरोनाबाबतचे नियम जारी केले होते. त्यात एखाद्या इमारतीत पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास ती इमारत सील करण्यात येणार असल्याचं पालिकेने स्पष्ट केलं होतं.


 ◆भारतात आतापर्यंत 1 कोटी 8 लाखाहून अधिक लोकांना व्हॅक्सीन देण्यात आली आहे. शनिवारी तर 1.86 लाख लोकांना व्हॅक्सीन देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत एक कोटी 8 लाख 38 हजार 323 लसींपैकी 72 लाख 26 हजार 653 डोस आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि 36 लाख 11 हजार 670 डोस फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section