😳 *विद्यार्थ्यांनो, ‘महापोर्टल’ नाही, तर आता 'या' चार कंपन्या करणार नोकरभरती !*
Pawan Digital Service.
💁🏻♂️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘ब’ आणि गट ‘क’ मधील रिक्त पदांच्या सरळसेवा पदभरती प्रक्रियेसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना ‘महापोर्टल’ प्रणालीऐवजी आता थेट कंपन्यांद्वारे सोप्या पध्दतीने भरती करण्याची पद्धत वापरात आणली जाणार आहे. अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.
💼 'या' 4 कंपन्या करणार नोकरभरती
▪️ ‘महापोर्टल’च्या जागी नव्या चार कंपन्यांची निवड भरती प्रक्रियेसाठी असलेली महापोर्टल कंपनी रद्द करून त्या ठिकाणी खालील चार कंपन्यांची निवड केली आहे.
1) मेसर्स ॲपटेक लिमिटेड
2) मेसर्स जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड
3) मेसर्स जिंजर वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड
4) मेसर्स मेटा-आय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड
▪️ या 4 कंपन्यांना महाराष्ट्रातील आगामी 5 वर्षांतील मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, त्याच्या अधिपत्याखालील शासकीय विभाग, ‘एमएपीएसी’च्या कार्यकक्षेबाहेरील गट ‘ब’ आणि गट ‘क’च्या परीक्षा पद्धती राबविण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.’
▪️ विद्यार्थ्यांच्याही असंख्य तक्रारी लक्षात घेत महाविकास आघाडी सरकारने तत्काळ या प्रणालीला स्थगिती देत सरळसेवा भरतीसाठी चार कंपन्यांची निवड केल्याची माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
🗣️ "दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या आपल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना सक्षम व पारदर्शक पदभरती प्रणाली उपलब्ध करण्यासाठी कोरोना संकटामुळे काही प्रमाणात वेळ लागत होता. यासंबंधीत राज्य सरकारकडून काढण्यात आलेली निविदा प्रक्रिया 11 डिसेंबर 2020 ला पूर्ण झाली. संबंधित शासन निर्णय 22 जानेवारी 2021 ला प्रसिद्ध केला आहे, असे गृह राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖