Ladki Bahin Yojana KYC : लाडकी बहिण योजना हि महाराष्ट्र शासनाची महत्वपूर्ण योजना आहे, जी राज्यातील महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून सक्षम करण्यासाठी सुरु केली आहे. या योजेनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आता e-KYC करावी लागणार आहे. हि प्रक्रिया शासनाकडून सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थीने ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची केवायसी करण्यासाठी शासनाने वेबसाईट वरती ई-केवायसी पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या पर्यायाद्वारे महिला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. काही महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसून देखील लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहेत हे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे शासनाने आता ई-केवायसी प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे अशा सर्व महिलांना आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
योजनेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे, आर्थिक लाभ मिळावा याकरिता ई केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. हि प्रक्रिया मोबाईल वरून करता येते. पुढील दोन महिन्यात हि प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास विभागामार्फत करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठीही मदत होणार आहे.