पोलीसांची ११,९५६ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण, नवीन ७५०० पदांची भरती डिसेंबर मध्ये ! Maharashtra Police Bharti 2024
Type Here to Get Search Results !

पोलीसांची ११,९५६ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण, नवीन ७५०० पदांची भरती डिसेंबर मध्ये ! Maharashtra Police Bharti 2024

 

पोलीसांची ११,९५६ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण, नवीन ७५०० पदांची भरती डिसेंबर मध्ये ! Maharashtra Police Bharti 2024 @policerecruitment2024.mahait.org

मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, राज्यात गेल्या दोन वर्षांत जवळपास ३५ हजार पोलिसांची भरती झाली. पण आपल्या साठी लवकरच अजून एक पोलीस भरतीची संधी मिळणार आहे. आता पुन्हा डिसेंबरमध्ये जवळपास 7,500 पदांची मोठी भरती होणार आहे. साधारण साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदे आहेत. राज्यात २०२२ व २०२३ मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे. रिक्त पदे भरण्याकरता भरती प्रक्रिया घेण्यात आली त्यात १७,४७१ रिक्त पदांसाठी ११९५६ पदांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.



Join Instagram  Join Now
Telegram Group                                                              Join 



करोना काळात सुमारे तीन वर्षे राज्य पोलीस दलात भरती झाली नाही. त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे. गेल्या दोन वर्षांत अनुक्रमे १८ हजार व १७ हजार पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली. परंतु त्या तुलनेने आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी, लवकरात लवकर सध्याची १४ हजार ४७१ पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते. आतापर्यंत २५ जिल्ह्यांत पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदाने न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशीराने सुरू झाली होती. परंतु ती ही लवकरात लवकर संपवण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यात नवीन पोलिस भरतीला सुरुवात होणार आहे.

प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढणार

राज्यातील १० पोलीस प्रशिक्षण केंद्रांची क्षमताही आता वाढविण्यात आली आहे. सध्या १० प्रशिक्षण केंद्रांमध्ये ८४०० पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते. येणाऱ्या काळात त्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन व उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले होते. मराठा आरक्षणाचा लढा सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील पोलीस भरतीत मराठा समाजातील ईडब्ल्यूएस प्रवर्गातील भावी पोलिसांची उमेदवारी स्थगित करण्यात आली आहे. ईडब्ल्यूएस प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांची तात्पुरती स्थगिती ठेवण्याचे आदेश 30 जुलैला अपर महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

राज्य पोलिस दलातील भरती प्रक्रियेत ‘एसईबीसी’ व ‘ओबीसी’ ऐवजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून अर्ज दाखल केलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द न करता त्यांची प्रकरणे स्थगित ठेवण्याचे आदेश प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिले आहेत. त्यातून बृहन्मुंबई, लोहमार्ग, हिंगोली पोलिसांना वगळण्यात आले आहे. नाशिक जिल्हयातील तात्पुरत्या निवड यादीतील EWS प्रवर्गातील 6 पैकी 4 मराठा उमेदवारांनी हमीपत्र देण्यास नकार दिल्याची माहिती मिळत आहे.

या निर्णयामुळं मराठा उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. तर,  इतर प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मात्र मोकळा ठेवण्यात आला आहे. याबाबतचा आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी 16 जुलैला जाहीर केल्यानंतर अशा उमेदवारांना हमीपत्र बंधनकारक करण्यात आले होते. मात्र काही विद्यार्थ्यांनी याला नकार दिल्यामुळे अशा विद्यार्थ्यांची भरती थेट स्थगित करण्यात आली आहे.

मराठा समाजाचा उमेदवारांची निवड करण्याबाबत प्रवर्गाचा गोंधळ अद्याप सुरूच आहे. एसीबीसी किंवा खुला प्रवर्गापैकी एकाची निवड करण्यासंबंधात ईडब्ल्यूएस प्रवर्गातील एकाची निवड करण्याचे आदेश देण्यात आले होते. भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडून हमीपत्र घेण्याची सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र नाशिकमध्ये चार उमेदवारांनी यासाठी नकार दिल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र, आता शासन निर्णय होत नाही तोवर केवळ या उमेदवारांचे प्रशिक्षण स्थगित करण्याचे आदेश कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

…म्हणून प्रवर्ग बदलास नकार !

शहर पोलिस आयुक्तालयाकडे प्राप्त उमेदवार अर्जापैकी चौघांनी प्रवर्ग बदलण्यास नकार दिला आहे. कारण प्रवर्ग बदलला तर ते प्रतीक्षा यादीत जातील, आता सध्या ते तात्पुरत्या निवड यादीत आहेत. यामुळे ते ‘ईडडब्ल्यूएस’ प्रवर्गावर ठाम राहिले आहे. त्यांनी याच प्रवर्गातून आम्हाला आरक्षण द्यावे, अशी लेखी
विनंती पोलिस आयुक्तालयाकडे केली आहे.

…आता पुढील शासकीय आदेशाकडे लागले लक्ष !

पोलिस आयुक्तालयासह राज्यभरातून ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांनी हमीपत्र देण्यास नकार देत त्यावर आक्षेप घेतला होता. यामुळे आता मंगळवारी नव्याने प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी पत्र काढले आहे. या पत्रानुसार संबंधित उमेदवारांची उमेदवारी रद्द न करता तात्पुरती स्थगीत ठेवून त्याप्रकरणी पुढील आदेशाची प्रतीक्षा करावी, असे म्हटले आहे. यामुळे शासनाकडून काय धोरण निश्चित केले जाते व नवीन शासननिर्णय काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नियुक्तीची कार्यवाही पुढे सुरू ठेवा
डब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांच्या उमेदवारीचा अपवाद वगळता उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची पुढील कार्यवाही सुरू ठेवण्यात यावी, असेही नव्याने जारी करण्यात आलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाकडून धोरण निश्चित होताच नवीन शासननिर्णय प्राप्त होताच संबंधित पोलिस आयुक्तालय व अधीक्षक कार्यालयांना कळविण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे.


Maharashtra Police Vacancy 2024 Details

पोलीस भरती साठी या वर्षी अजून एक संधी प्राप्त होणार आहे. २०२४ च्या अखेरीस अजून एक नवीन भरती प्रक्रिया होणार आहे. मित्रांनो, प्राप्त माहिती नुसार राज्यात सध्या २०२३ मधील रिक्त असलेल्या १७ हजार ४७१ पोलिस जागांवर भरती सुरू असून १ सप्टेंबरपूर्वी ही भरती संपणार आहे. त्यानंतर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या काळातील अंदाजे सात हजार पोलिसांची भरती होईल, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आतापर्यंत दोनवेळा पोलिस भरती झाली आहे. त्यांच्याच कार्यकाळात १९७६ चा गृह विभागाचा आकृतिबंध बदलून नवीन तयार केला. वाढती गुन्हेगारी, शहर-जिल्ह्यांचा विस्तार व वाढलेली लोकसंख्या आणि पोलिस ठाण्यांची गरज ओळखून त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानुसार मागील अडीच-तीन वर्षांत ३० हजार पोलिसांची भरती झाली आहे. राज्यातील दहा पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता देखील आता वाढविण्यात आली असून सध्या तेथील नवप्रविष्ठ पोलिस शिपायांचे प्रशिक्षण सप्टेंबरमध्ये संपणार आहे. 

 

तत्पूर्वी, १ सप्टेंबरपर्यंत सध्याची १४ हजार ४७१ जागांची पोलिस भरती पूर्ण करण्याचा आदेश गृह विभागाने सर्वच जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. आतापर्यंत २५ जिल्ह्यांत पोलिस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यात बॅँडमॅनसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची स्थिती पाहून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर नवीन पोलिस भरतीला सुरवात होणार आहे.

रिक्त पदांचा आढावा घेऊन भरतीचा प्रस्ताव

सध्याच्या १७ हजार ४७१ पोलिस जागांसाठी राज्यभरातून १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यापूर्वी १३ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया संपल्यानंतर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस पदांच्या भरतीचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला जाणार आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी या नव्या भरतीला सुरवात होऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले.

शहर-जिल्ह्याच्या पोलिस प्रमुखांनी द्यावेत प्रस्ताव

अनेक शहरांचा विस्तार वाढला, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, लोकसंख्याही वाढली, वाहनांची संख्या वाढली, अशावेळी पूर्वीचे मनुष्यबळ निश्चितपणे कमी पडत आहे ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ज्या शहर-जिल्ह्यात नवीन पोलिस ठाण्यांची गरज आहे, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, पोलिस शिपाई अशी पदे कमी आहेत, त्यांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर करावेत. त्याचा पाठपुरावा केल्यास निश्चितपणे मनुष्यबळ वाढवून मिळेल, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section