🗞️आजच्या पेपर मधील महत्वाचे मुद्दे👇
Type Here to Get Search Results !

🗞️आजच्या पेपर मधील महत्वाचे मुद्दे👇

 🗞️आजच्या पेपर मधील महत्वाचे मुद्दे👇



धीरज सिंह यांची FTII संचालकपदी नियुक्ती

◾️1995 च्या बॅचचे भारतीय माहिती सेवा अधिकारी

◾️सध्या ते PIB चे अतिरिक्त महासंचालक आहेत

◾️त्यांचे नुकतेच प्रकाशीत झालेले पुस्तक "मॉडर्न मास्टर्स ऑफ सिनेमा: अ पर्सनल पँथिऑन'

◾️त्यांचा कार्यकाळ 5 वर्षे असेल

➖➖➖

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ( FTII )

◾️स्थपणा : 1960 साली

◾️अध्यक्ष : आर माधवन

◾️भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत आणि केंद्र सरकारच्या सहाय्याने एक चित्रपट संस्था आहे

➖➖➖➖

*⭐ नुकत्याच झालेल्या नियुक्त्या*

◾️मोहम्मद युनूस : बांग्लादेश च्या अंतरिम सरकारचे प्रमुख

◾️सुर्यकुमार यादव : T20 संघाचा कर्णधार

◾️गौरव गोगई : काँग्रेसचे लोकसभेतील उपनेतेपदी 

◾️के. सुरेश : काँग्रेस पक्षाचे मुख्य व्हीप नियुक्ती

◾️गौतम गंभीर : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक

◾️अमृत ​​मोहन प्रसाद : केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चे विशेष DG म्हणून नियुक्ती

◾️TV रावीचंद्रन : उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

➖➖➖➖➖

*⭐ हॉकी मध्ये भारतीय संघाला : कांस्य पदक*

◾️उपविजेता : स्पेन

◾️विजय : 2-1 ने विजय

◾️कर्णधार : हरमप्रीत सिंग ( 2 गोल केले)

◾️भारतीय पुरुष हॉकी संघाचेे ऑलिंपिकमधील 13 वे पदक ( 8 सुवर्ण , 1 रौप्य , 4 ब्रॉंझ)

◾️हॉकी संघाने 1928 ते 1956 : सलग 6 सुवर्णपदके जिंकली

◾️कर्णधार हरमनप्रीत सिंगने पॅरिस ऑलिम्पिकमधील 10 गोल केले.( स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे)

➖➖➖➖

*⭐ पी आर श्रीजेश यांनी हॉकी मधून निवृत्ती🏑*

◾️"Wall Of India"

◾️8 मे 1988 : केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील किझाकंबलम गावात जन्मल

◾️परतु रवींद्रन श्रीजेश

◾️भारतीय हॉकी संघाचे गोलरक्षक

◾️आपल्या कारकिर्दीत 336 आंतरराष्ट्रीय सामने खेळले

◾️36 वर्षीय श्रीजेशचे हे चौथे ऑलिम्पिक खेळला

◾️2015 : अर्जुन पुरस्कार

◾️2017 : पद्मश्री

◾️2021 : खेलरत्न पुरस्कार  

◾️2021, 2022 : सर्वोत्कृष्ट ॲथलीट म्हणून निवड

◾️2016 : हॉकी संघाचा कर्णधार बनला होता

◾️ऑलिम्पिकमध्ये त्याच्या गोलकीपिंगमुळे त्याने भारताला 41 वर्षांनंतर पुरुष हॉकीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकता आहे ( 6 पैकी 5 गोल आडवले)

◾️चार ऑलिम्पिक खेळणारा श्रीजेश हा पहिला भारतीय गोलकीपर आहे.

➖➖➖➖

*⭐ संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग*

◾️9 ऑगस्ट ला केशवराव भोसले यांची 134 वी जयंती होती

◾️9 ऑगस्ट ला : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार होते

*🙂 कोण होते केशवराव भोसले❓*

◾️केशवराव हे मराठी नाट्यसृष्टीतील एक श्रेष्ठ गायक अभिनेते होते.

◾️9 ऑगस्ट1890 ते 4 ऑक्टोबर 1921

◾️ जन्म : कोल्हापुर

◾️वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी ललित कलादर्शन नाटक मंडळीची स्थापना केली होती.

◾️1916 मध्ये राज्यश्री शाहू महाराज यांनी त्यांना कोल्हापूरसाठी निमंत्रित केलं होतं. कोल्हापूरमध्ये त्यांना दहा हजार रुपये मिळाले होते

◾️32 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

➖➖➖➖➖

*⭐ महत्त्वाचे Oneliner*

◾️आचार्य अत्रे पुरस्कार डॉ. जब्बार पटेल यांना मिळाला

◾️2035 पर्यत: भारत पाहिले अंतराळ स्टेशन स्थापन करणार

◾️2040 पर्यत : भारत चंद्रावर पहिला माणूस पाठवणार

◾️9 ऑगस्ट : जागतिक आदिवासी दिवस

◾️9 ऑगस्ट : ऑगस्ट क्रांती दिवस

➖➖➖➖➖

*⭐ अर्शद नदीम : पाकिस्तान ला पाहिले वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवून दिले*

◾️भालाफेक : 92.97 मीटर भाला फेकला

◾️हा नवीन ऑलम्पिक रेकॉर्ड बनला आहे

◾️पाकिस्तान ने आतापर्यंत एकूण 11 ऑलम्पिक पदके जिंकली आहेत

◾️पाकिस्तान हॉकी संघाने 3 वेळा सुवर्ण पदक जिंकले आहे (अर्शद नदीम चे हे चौथे सुवर्ण आहे - वैयक्तिक पाहिले)

➖➖➖➖➖➖

*⭐  बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन :पश्चिम बंगाल चे माजी मुख्यमंत्री (80)*

◾️मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप)

◾️पश्चिम बंगाल चे 7 वे मुख्यमंत्री (2000 ते 2011 पर्यंत)

◾️24 वर्षे आमदार होते.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section