पाकिस्तान विरोधात ‘प्लेअर ऑफ मॅच’ पुरस्कार मिळालेला तबरेझ शम्सी कोण आहे?
- चेन्नईमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेतील अटीतटीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर एका विकेटने निसटता विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या विजयात फिरकीपटू तबरेझ शम्सीने सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळेच त्याला ‘प्लेअर ऑफ मॅच’ पुरस्कार मिळाला. या पार्श्वभूमीवर तबरेझ शम्सी कोण आहे याचा हा आढावा…
- तबरेझ शम्सीचा जन्म १८ फेब्रुवारी १९९० रोजी झाला. ३३ वर्षीय तबरेझने २००९ मध्ये स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. फ्रँचायज क्रिकेटनंतर त्याला पहिली संधी २०१६ मध्ये आयपीएल चषकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिली. सॅम्युअल बद्री जखमी झाल्याने त्याला ही संधी मिळाली.
२०१७ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रकारात पदार्पण
- त्या सिझनमध्ये शम्सीला केवळ ४ सामन्यांमध्ये खेळता आलं. मात्र, गोलंदाजांसाठी प्रतिकुल वातावरण असल्याने त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. २०१७ मध्ये तबरेझ शम्सीने दक्षिण अफ्रिका संघासाठी खेळताना टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
२०१३-१४ मध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला
- स्थानिक क्रिकेटमध्ये खेळताना सुरुवातीचे काही वर्ष तबरेझ शम्सीला आपल्या खेळाचं सर्वोत्तम प्रदर्शन करता आलं नाही. २०१३-१४ मध्ये त्याने आपल्या उत्तम गोलंदाजीची ताकद दाखवत ४७ विकेट घेत तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला. या खेळीने अनेकांचं लक्ष त्याच्या खेळाकडे खेचलं. २०१५ मध्ये त्याला कॅरिबियन प्रीमियर लीगकडून करारबद्ध करण्यात आलं. तसेच २०१६ मध्ये त्याला थेट आयपीएलमध्ये संधी मिळाली.
तिरंदाज शीतलला दोन सुवर्णपदके; पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची आतापर्यंत ९९ पदके
- दोन्ही हात नसतानाही भारताच्या युवा शीतल देवी हिने तिरंदाजी प्रकारात पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. एकाच स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवणारी शीतल पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. भारताची या स्पर्धेत आतापर्यंत ९९ पदके झाली आहेत. याच आठवडय़ात अंकुर धमाने एकाच स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवली होती.
- भारताने शुक्रवारी सात सुवर्णपदकांसह १७ पदकांची कमाई केली. यामध्ये बॅडिमटनमधील ८ पदकांचा समावेश होता. स्पर्धेला एक दिवस बाकी असून, भारत २५ सुवर्ण, २९ रौप्य आणि ४५ कांस्यपदकांसह ९९ पदके मिळवून सहाव्या स्थानावर आहे. चीन सुवर्णपदकांच्या द्विशतकाच्या उंबरठय़ावर आहेत. चीनने आतापर्यंत १९६ सुवर्ण, १५९ रौप्य आणि ४५ कांस्यपदके मिळवली आहेत. एकूण पदकांच्या क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर असला तरी, सुवर्णपदकांची संख्या कमी असल्यामुळे भारताची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.
- तिरंदाजीत शीतलने कम्पाऊंड प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदकाची कमाई केली. शीतलने गुरुवारी मिश्र दुहेरीतही सुवर्णपदक जिंकले होते. जम्मू काश्मीरच्या १६ वर्षीय शीतलने महिलाच्या दुहेरीत रौप्यपदकही मिळवले आहे. दोन्ही हात नसताना शीतल पायाने आपले लक्ष्य भेदते. अंतिम फेरीत शीतलने सिंगापूरच्या अलिम नूर स्याहिदाहचा १४४-१४२ असा पराभव केला. बॅडिमटनमध्ये प्रमोद भगतने आपलाच सहकारी नितेश कुमारचा २२-२०, २१-१९ असा पराभव करून ‘एसएल-३’ प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
- दुहेरीत नितेश-तरुणने सुवर्णपदक मिळवले. महिला विभागात थुलासिमथी मुरुगेसन हिने चीनच्या यांग क्वीउशियाचा २१-१९, २१-१९ असा पराभव करून सुवर्णपदकाची कमाई केली. पॅरालिम्पिक विजेता कृष्णा नगरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुण्याच्या सुयश जाधवने जलतरणातील पहिले पदक भारताला मिळवून दिले. तो ‘एस-७’ प्रकारात पुरुषांच्या ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्यपदकाचा मानकरी ठरला.
प्रतियुती असल्याने गुरू येणार पृथ्वीच्या सर्वांत जवळ, कधी आणि कसे पाहता येणार? जाणून घ्या…
- सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह गुरू हा सूर्याशी प्रतियुतीत येत असून येत्या ३ नोव्हेंबरला तो पृथ्वीच्या सर्वांत जवळ पाहायला मिळणार आहे, अशी माहिती येथील खगोल अभ्यासकांनी दिली आहे.
- पृथ्वीपासून गुरूचे सरासरी अंतर ९३ कोटी किमी आहे. गुरूचा व्यास १,४२,८०० किमी आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी मारण्यास ११.८६ वर्षे लागतात. गुरूला एकूण ७९ चंद्र आहेत. टेलिस्कोपमधून गुरूचे निरीक्षण केले असता गुरूवरचा पट्टा व चार चंद्र दिसतात. ७ डिसेंबर १९९५ रोजी मानवविरहित यान ‘गॅलिलिओ’ गुरूवर पोहोचले. गुरूवर जीवसृष्टी असल्याचा कोणताही पुरावा अजूनपर्यंत मिळालेला नाही.
- ३ नोव्हेंबरला सूर्यास्तानंतर थोड्याच वेळात गुरू, ग्रह क्षितिजावर उगवेल आणि पहाटे पश्चिमेकडे मावळेल. हा ग्रह अत्यंत तेजस्वी दिसत असल्याने तो सहज ओळखता येईल व साध्या डोळ्याने पाहता येणार आहे. ग्रेट रेड स्पॉट, युरोपा, गॅनिमीड, आयोव कॅलेस्टो हे गुरूचे चार चंद्र मात्र साध्या डोळ्याने दिसू शकणार नाही. यासाठी टेलिस्कोपची आवश्यकता असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.
- पृथ्वीपेक्षा गुरू हा ११.२५ पट मोठा आहे. रक्तरंगी ठिपका हे गुरूचे खास वैशिष्ट्य, ‘ग्रेट रेड स्पॉट’ या नावाने हा ठिपका ओळखला जातो. ४० हजार किमी लांब १४ हजार किमी रुंदीचा हा अवाढव्य ठिपका आहे. या ठिपक्याचे निरीक्षण केले असता ते एक प्रचंड चक्रीवादळ असल्याचे सहज लक्षात येईल. गुरूवर घोंघावणारे चक्रीवादळ एका विशिष्ट ठिकाणीच का निर्माण झाले, याचे कारण मात्र अजूनही अज्ञात असल्याचे गिरूळकर यांनी सांगितले.
देशात दहा महिन्यांत १५० हून अधिक वाघांचा मृत्यू; महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण
- जागतिक व्याघ्रदिनी भारतातील वाघांची संख्या जाहीर झाली आणि त्यांच्या संख्यावाढीने व्याघ्रप्रेमींच्या आनंदाला भरते आले. मात्र, त्यांच्या आनंदात विरजण घालणारी वाघांच्या मृत्यूची आकडेवारी आता उजेडात आली आहे. २०२३च्या पहिल्या दहा महिन्यांत देशात १५०हून अधिक वाघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही ४० पेक्षा अधिक वाघ मृत्युमुखी पडले आहेत.
- सन २०१३ मध्ये पहिल्या दहा महिन्यांत ६८ वाघ मृत्युमुखी पडले होते. तर दहा वर्षांनंतर हा आकडा दुपटीपेक्षाही अधिक झाला आहे. गेल्या दहा महिन्यांत महाराष्ट्रात ४२ वाघांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर मात्र देशात आणि महाराष्ट्रात अनुक्रमे १४८ आणि ३२ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. जागतिक व्याघ्रदिनी जाहीर करण्यात आल्यानुसार वाघांच्या संख्येत महाराष्ट्र ४४४ वाघांसह चौथ्या क्रमांकावर आहे, पण मृत्यूचा विचार केला तर महाराष्ट्रात वाघांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्यांपैकी अनेक मृत वाघांची नोंद ‘नैसर्गिक मृत्यू’ अशी करण्यात आली आहे, पण या नैसर्गिक मृत्यूमागे अनैसर्गिक कारणे असू शकतात. मानव-वन्यजीव संघर्षात वीजप्रवाह, विषप्रयोग यांसारखी कारणे आणि शिकारीचे धोके वाढत आहेत. त्यामुळे भारतातील वाघांच्या संख्येवर त्याचा परिणाम होण्याची भीती वन्यजीव अभ्यासकांच्या वर्तुळात व्यक्त केली जाते. त्याच वेळी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर आणि कॉरिडॉरमध्ये पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. वाघांच्या मृत्यूमागे हीदेखील कारणे आहेत.
नियंत्रणासाठी काय?
- ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यासंदर्भात म्हणाले की २०१३ मध्ये वाघांच्या शिकारीचे सत्र उघडकीस आल्यानंतर मेळघाट वन्यजीव गुन्हे शाखा स्थापन झाली. त्यातून चांगले काम झाले. नागपूर प्रादेशिक वनखात्यानेही उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या नेतृत्त्वाखाली वाघांच्या मृत्यूची अनेक प्रकरणे समोर आणली, त्यांचा तपास केला. याच पद्धतीचे काम राज्यात झाले, तर वाघांच्या वाढत्या मृत्यूंवर नियंत्रण आणता येईल.
जबाबदारी कोणाची?
- नियोजनाचा अभाव, खातेप्रमुखांची प्रशासनावरील सैल झालेली पकड या बाबी वाघांच्या मृत्यूस जबाबदार आहेतच, पण वनखाते आणि वन्यजीव, गावकरी यांच्यातील दुवा म्हणून नियुक्त केलेले मानद वन्यजीव रक्षक आणि राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य त्यांची जबाबदारी गांभीर्याने पार पाडतात का, हे पडताळणे आवश्यक असल्याचे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे.
आयफोनची निर्मिती आता ‘टाटा’च्या हातात! विस्ट्रॉनने दिली मंजुरी, चीनला मिळणार का टक्कर?
- आयफोन प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतात आता आयफोनची निर्मिती टाटा समूह करणार आहे. विस्ट्रॉन या कंपनीकडून ही निर्मिती केली जात होती. या कंपनीकडूनच अॅपलला भारतातून जागतिक व्यापारपेठ मिळाला होता. परंतु, आता टाटाने विस्ट्रॉन कंपनी विकत घेतली आहे. इलक्ट्रॉनिक आणि टेक्नॉलॉजी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली.
- अॅपल कंपनीच्या नियमांमुळे विस्ट्रॉन कंपनी तोट्यात होती. त्यामुळे ही कंपनी टाटा विकत घेणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. विस्ट्रॉन कॉर्पच्या संचालक मंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत इतर सहयोगी कंपन्यांनी कराराला मान्यता दिली आहे. टाटांना विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंगमधील दोन्ही कंपन्यांचे १०० टक्के शेअर्स मिळणार आहेत.
- भारतीय कंपनी करणार आयफोनची निर्मिती
- विस्ट्रॉनचा कर्नाटकमध्ये आयफोन निर्मितीचा प्लांट आहे. इथं आयफोन १२ आणि आयफोन १४ ची निर्मिती झाली. हाच प्लांट आता टाटा समूह विकत घेणार आहे. विस्ट्रॉनच्या निमित्ताने आयफोन भारतात तयार होत होते. परंतु, विस्ट्रॉन ही तैवानची कंपनी आहे. याचाच अर्थ भारतात आयफोनची निर्मिती होत असली तरीही स्थानिक कंपनीकडे हा व्यवहार नव्हता. मात्र, आता टाटाच्या निमित्ताने आयफोनची निर्मिती भारतीय कंपनी करणार आहे.
- आयफोन १५ ची निर्मिती भारतात केली गेली. परंतु, आयफोन १५ प्रो चीनमध्ये तयार केला जातो. अॅपलच्या एकूण उत्पादनांपैकी ७ टक्के उत्पादने भारतात तयार होतात. तर, चीन अजूनही अॅपलचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. त्यामुळे आता चीनला भारत टक्कर देणार का हे पाहावं लागणार आहे.
- दरम्यान, या कराराविषयी माहिती देताना केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी PLI योजनेने भारताला स्मार्टफोन उत्पादन आणि निर्यातीसाठी एक विश्वासार्ह आणि प्रमुख केंद्र बनण्यास प्रवृत्त केले आहे. आता अवघ्या अडीच वर्षांत टाटा कंपनी देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी भारतातून आयफोन बनवण्यास सुरुवात करेल. विस्ट्रॉन ऑपरेशन्सचा ताबा घेतल्याबद्दल टाटा टीमचे अभिनंदन.”
- ‘टेस्ट अॅटलास’ या फूड अॅण्ड ट्रॅव्हल गाईडने खीर व फिरणी या भारतातील दोन पारंपरिक गोड पदार्थांचा ‘जगातली सर्वोत्तम १० खिरींमध्ये’ समावेश केआहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे.तांदळाचे पीठ, दूध, साखर व वेलची यांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या उत्तर भारतातील फिरणीने सातवा क्रमांक मिळवला आहे.तर, सणासुदीच्या दिवसांत घराघरांतून तयार होणाऱ्या खिरीने दहावे स्थान मिळवले आहे. त्यात दूध व तांदूळ हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. खिरीची चव ही इतर घटकांवर म्हणजेच सुका मेवा, फळे आणि इतर गोष्टींवर ठरते.
- पहिल्या क्रमांकावर इराणचा शोले जर्द (Sholeh Zard) हा तांदूळ व केशर वापरून बनवलेला गोड पदार्थ आहे. या पदार्थावर शेवटी दालचिनीची पूड, चांदीचा वर्ख लावलेले बदाम किंवा पिस्त्याची सजावट केल्याने बघताच क्षणी तो मनात भरतो.
- भारताव्यतिरिक्त अजून कोणकोणते देश व पदार्थ या यादीत आहे ते पाहू.
- पहिल्या क्रमांकावर इराणचा शोले जर्द (Sholeh Zard) हा तांदूळ व केशर वापरून बनवलेला गोड पदार्थ आहे. या पदार्थावर शेवटी दालचिनीची पूड, चांदीचा वर्ख लावलेले बदाम किंवा पिस्त्याची सजावट केल्याने बघताच क्षणी तो मनात भरतो.
- इटलीच्या जगप्रसिद्ध व सर्वांच्या लाडक्या पन्ना कोटा हे आठव्या क्रमांकावर असून, तुर्कीच्या काही अप्रतिम पदार्थांनी या यादीत तीन जागा पटकावल्या आहेत. त्यापैकी गुलाब पाणी किंवा व्हॅनिलाच्या चवी असलेला ‘फिरीन सॉटलक’ (Firin sutlac) हा पदार्थ दुसऱ्या स्थानावर आहे. हा एक तुर्की पदार्थ असून तांदळाच्या खिरीचा एक प्रकार आहे जो ओव्हनमध्ये बनवला जातो. ‘कजानडीबी’ (Kazandibi) या पदार्थाला पाचवे स्थान तर, चिकन वापरुन बनवलेला ‘तावुक गोगसुला’ (Tavuk gogsu) नववे स्थान देण्यात आले आहे.
भारताच्या खिरींना जगभरात पसंती! पाहा, कोणाला मिळाले कितवे स्थान…
भारताव्यतिरिक्त अजून कोणकोणते देश व पदार्थ या यादीत आहे ते पाहू.
◆ आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये समाविष्ठ व्हायचे असल्यास खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जॉईन करा.
● काही अडचण आल्यास खाली कमेंटमध्ये लिहा.