◆ जागतिक पर्यटन संघटनेने 2023 च्या 54 उत्कृष्ट पर्यटन गावांच्या यादीत गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील ‘धोरदो गाव’ समाविष्ट केले आहे.
◆ भारत आणि नेपाळमधील 'झुलाघाट सस्पेंशन ब्रिज' पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे.
◆ 20 ऑक्टोबर रोजी ‘जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस’ साजरा करण्यात आला.
◆ भारतीय सैन्याने युनायटेड किंगडममध्ये ‘कॅम्ब्रियन पेट्रोलिंग कॉम्पिटिशन 2023’ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.
◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या सेमी-हाय स्पीड प्रादेशिक रेल्वे सेवेचे 'नमो भारत' उद्घाटन केले.
◆ 22 वर्षीय कुर्दिश-इराणी महिला 'झिना महसा अमिनी' यांना युरोपियन युनियनच्या 'सखारोव पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आले आहे.
◆ भारत सरकार आणि शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘वन नेशन वन स्टुडंट आयडी कार्ड’ला ‘APAAR आयडी’ असे नाव देण्यात आले आहे.
◆ राजस्थानच्या जयपूरमध्ये लोककलांना वाहिलेला 11 दिवसांचा लोकरंग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
◆ 'REC लिमिटेड' ला आपत्ती व्यवस्थापनात 'गोल्डन पीकॉक अवॉर्ड' देण्यात आला आहे.
◆ केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये भारत सरकारने ‘स्पोर्ट्स इंडिया स्टेट एक्सलन्स सेंटर’ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.
◆ उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथे 'पशुवैद्यक विज्ञान महाविद्यालय' बांधले जाणार आहे.
◆ PUMA इंडियाने भारतीय गोलंदाज 'मोहम्मद शमी'ला आपला ब्रँड ॲम्बेसेडर बनवले आहे.
◆ ‘ओडिशा राज्य सरकारने’ मका लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे.
◆ केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ‘हार्टलँड त्रिपुरा प्रकल्पा’चे उद्घाटन केले.
अलीकडेच 'जम्मू काश्मीर'मध्ये हाय-टेक, ग्लास-सीलिंग व्हिस्टाडोम कोच लॉन्च करण्यात आला आहे.
◆ झारखंडचे माजी मुख्यमंत्री 'रघुवर दास' यांची ओडिशा राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━