“भारतात मुस्लिम आहेत म्हणून तुम्ही हिंदू आहात” किरण मानेंनी शेअर केलेलं मीम चर्चेत; म्हणाले, “एका फटक्यात….”
Type Here to Get Search Results !

“भारतात मुस्लिम आहेत म्हणून तुम्ही हिंदू आहात” किरण मानेंनी शेअर केलेलं मीम चर्चेत; म्हणाले, “एका फटक्यात….”

Top Post Ad

 


अभिनेते किरण माने यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून खरंतर ते घराघरात पोहोचले. त्यानंतर झालेल्या वादामुळे ते आणखी प्रकाशझोतात आले. काही काळ ते कोणत्याही मालिकेमध्ये झळकले नाही. पण नंतर बिग बॉस मराठी चौथ्या पर्वात त्यांनी प्रवेश केला आणि पुन्हा एकदा आपल्या खेळातून आणि स्पष्टवक्ते स्वभावाने प्रक्षेकांनी मनं जिंकून घेतली. असे चर्चेत असणारे किरण माने सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी एक मीम सोशल मीडियावर शेअर केलं आहे; ज्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

किरण माने यांनी शेअर केलेल्या मीममध्ये ‘द डार्क नाईट’ या चित्रपटामधला एक सीन आहे. पोलीस स्टेशनमधील जोकर आणि बॅटमॅनच्या संवादाचा हा सीन आहे. या मीममध्ये या सीनचा वापर करून जोकर सांगताना दिसतोय की, ‘पुन्हा सांगतो लक्षात घे. भारतात मुस्लिम आहे म्हणून तुम्ही हिंदू आहात; नंतर तुम्ही खालच्या किंवा वरच्या जातींचे राहणार.’ हे मीम शेअर करत किरण माने यांनी लिहीलं आहे की, “…हे मीम लै खोल हाय. एका फटक्यात भानावर आननारं हाय. बघा. विचार करा. लब्यू जितेंद्र रायकर.”

किरण माने यांनी या मीममधून मांडलेल्या मताशी चाहते देखील सहमती प्रतिक्रियेद्वारे दर्शवत आहेत. ‘बरोबर आहे किरण सर,’ असं एका चाहत्यानं लिहीलं आहे. तर दुसऱ्या चाहत्यानं लिहीलं आहे की, ‘वैचारिक सुबत्तेचं जिवंत उदाहरण म्हणजे हे वास्तववादी मीम.’ तसेच तिसऱ्या चाहतीनं लिहीलं आहे की, ‘खरंतर हेच भूत काढून टाकून युगा पिढीनं जर जात-जात करत बसण्यापेक्षा क्लास कसा वाढवता येईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे.”

दरम्यान, किरण माने यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्यांनी सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारली असून ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.

Below Post Ad