चंद्रावरची सकाळ, दुपार, संध्याकाळ
Type Here to Get Search Results !

चंद्रावरची सकाळ, दुपार, संध्याकाळ

Top Post Ad

 माझी ऍस्ट्रोफोटोग्राफी - चंद्रावरची सकाळ, दुपार, संध्याकाळ

ठिकाण - क्रेटर क्लॅव्हिअस (Crater Clavius region)


चंद्र पृथ्वी भोवती सुमारे ३० दिवसात १ फेरी पूर्ण करतो त्या वेळी त्यावर पडणारा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या दिवसाच्या तुलनेत खालील प्रमाणे विभागला जातो असे मानूया, 


एकूण ३० दिवस = १५ दिवस + १५ रात्र

१५ दिवस = १५ / ३ =  ५ दिवस 


म्हणजे तिथे दिवस असताना कोणत्याही भूभागाला असे मनू शकतो, 

 

पृथ्वीचे ५ दिवस = चंद्रावरची सकाळ 

पृथ्वीचे ५ दिवस = चंद्रावरची दुपार 

पृथ्वीचे ५ दिवस = चंद्रावरची संध्याकाळ

पुढील पृथ्वीचे १५ दिवस = चंद्रावरची रात्र 


एखाद्या भागात चंद्रावर सकाळ होते म्हणजे तिथे सूर्य क्षितीजाच्या वर येतो (उगवतो),

दुपार होते म्हणजे सूर्य तेथील आकाशात मध्यावर येतो म्हणजे लंबवत किरणे पडतात. 

संध्याकाळ होते म्हणजे सूर्य पश्चिम क्षितीजाच्या जवळ जातो. 

आणि रात्र म्हणजे क्षितीजाच्या खाली जातो. 


फोटोत दाखविलेले ठिकाण हे क्रेटर क्लॅव्हिअस आहे. 

२२५ किमी व्यास असलेले हे एक मोठे क्रेटर (खड्डा) चंद्रावर दक्षिण ध्रुवीय प्रदेशाच्या जवळ आहे. 


याचे वैशिष्टय असे की यात तुम्ही अनेक छोटी छोटी विवरांची रांग पाहू शकता जी एका अर्ध वर्तुळाकार रेषेत कमी कमी आकाराची होत गेली आहेत. 


एखादी रांगोळी डिझाईन काढतो तशी डिझाईन ह्या पूर्ण विवरांची दिसते. 


ह्या भागात सकाळ, संध्याकाळ सूर्याची किरणे तिरपी पडल्याने विवराच्या खोलगट भागात गडद सावल्या पडतात ज्यामुळे ही विवरे अजून त्रिमितीय असल्याचे दिसते. 

सकाळी ज्या दिशेत सावल्या आहेत त्याच्या विरुद्ध दिशेत संध्याकाळच्या सावल्या बनतात जसे पृथ्वीवर घडते. परंतु दोन्ही वेळेस विवराचे वेगवेगळे फिचर आपल्याला बघायला मिळतात जे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. 


दुपारच्या वेळी म्हणजे आपल्याइथे पौर्णिमा असते त्या आसपास हा सर्व भाग लंबवत पडणाऱ्या सूर्य किरणांनी उजळून निघतो आणि सावल्या नाहीश्या (अतिशय कमी प्रमाणात दिसतात) होतात. 

याच कारणाने पौर्णिमेच्या आसपास दुर्बिणीतून चंद्र बघणे टाळावे कारण त्यावरील हे वैष्ट्यपूर्ण भूभाग आपल्याला सपाट/एकसमान दिसतात. 


सावल्यांचा मुळेच या भूभागाची खरी रचना, खोली, आजूबाजूची छोटी विवरे या सर्वांची डिटेल्स आपल्याला दिसतात त्यामुळे हा भाग अर्ध चंद्र सप्तमी-अष्टमी असताना बघावा. 


एकाच भागाचे असे निरनिराळे डिटेल्स वेगवेगळ्या चंद्रकला असताना दिसतात हे यातून सांगायचे आहे. तिथे पडणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या कोनामुळे असे दिसते.

(The same region seen at different times shows different details because of sunlight angle)


मी हे फोटो ज्या दुर्बिणीने काढले आहेत त्याची माहिती कमेंट मध्ये बघा. 


वरील माहिती आवडल्यास शेअर बटणाचा वापर करून तुमच्या मित्र परिवाराला पाठवा.

Below Post Ad