Top Post Ad
भुजबळांनी देवी सरस्वती आणि ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आपल्यासाठी महात्मा फुले, सावित्राबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, रावसाहेब थोरात यांनी शिक्षणाची दारे खुली केली. कोणाला सरस्वती, तर कोणाला शारद आवडते. पण, आम्ही यांना पाहिलं नाही किंवा आम्हाला त्यांनी शिक्षण दिलं नाही, असं छगन भुजबळ यांनी होतं. ब्राह्मण घरात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत, असेही भुजबळ यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यांनंतर छगन भुजबळ यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
छगन भुजबळांच्या कानाखाली मारणाऱ्यांना १ लाख रुपयांच बक्षीस देणार, अशी घोषणा परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केली आहे. “छगन भुजबळांनी केलेलं वक्तव्य हिंदूधर्मविरोधी आणि हिंदू जातींमध्ये तेढ निर्माण करणारं आहे. तसेच, देवी सरस्वतीचा अपमान करणार आहे. छगन भुजबळांनी कोणाची पूजा करावी? हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.”
“आता तुम्हाला माफी नाही”
“पण, ब्राह्मण समाजावर अशी विधान करणे हे अत्यंत निषेधार्य आहे. त्यामुळे आता तुम्हाला माफी नाही. छगन भुजबळांच्या कानाखाली मारणाऱ्या तरुणाला १ लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल,” अशी घोषणा विश्वजीत देशपांडे यांनी केली होती.
“…तर मी मत बदलणार नाही”
यावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “असल्या फालतू धमक्यांना मी घाबरत नाही. गेली ५५ वर्षे मी समाजकारण आणि राजकारणात आहे. अशा अनेक धोक्यातून मी गेलेलो आहे. मला गोळी घाला असं कोणी म्हटलं, तर मी मत बदलणार नाही. हे आमचे शिक्षणातील देव आहेत, यांच्यामुळे आम्ही शिकलो,” असं भुजबळ म्हणाले.