परंतु, पश्चिम बंगाल मध्ये अशी दोन गावे आहेत, जी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करत नाहीत. त्यांचा स्वातंत्र्य दिन हा १५ ऑगस्ट नंतर असतो. काय कारण आहे या मागे
आज दि. १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारत देश ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. परंतु, पश्चिम बंगाल मध्ये अशी दोन गावे आहेत, जी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करत नाहीत. त्यांचा स्वातंत्र्य दिन हा १५ ऑगस्ट नंतर असतो. काय कारण आहे या मागे, भारत १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाला, तरी त्यांना स्वातंत्र्य मिळाले नव्हते का, यामागे काय इतिहास आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
कोणते जिल्हे १५ ऑगस्ट नंतर स्वातंत्र्य दिन साजरा करतात?
मालदा जिल्ह्यातील रतुआ गाव आणि दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील बालूरघाट गाव ही १५ ऑगस्टनंतर स्वातंत्र्यदिन साजरा करणारी दोन शहरे आहेत.संपूर्ण भारत दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करतो, परंतु, पश्चिम बंगालमधील काही गावांसाठी १५ ऑगस्ट नंतर काही दिवस वाट बघावी लागते. कारण, १५ ऑगस्ट, १९४७ रोजी हे जिल्हे स्वतंत्र भारताचा भाग झाले नव्हते. १९४७ मध्ये ऑगस्ट नंतर हे जिल्हे जेव्हा स्वतंत्र भारताचा भाग झाले, तेव्हा त्यांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला.
काय घडले १९४७ मध्ये ?
१२ ऑगस्ट १९४७ रोजी व्हाईसरॉय लुई माउंटबॅटन यांनी जाहीर केले की, १५ ऑगस्ट, १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य दिले जाईल. बंगाल हा वादाचा विषय राहिला. कारण, सिरिल रॅडक्लिफ या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या शिफारशींनुसार, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या फाळणीसाठी नकाशांसाठी सीमांकन, मोठ्या प्रमाणात हिंदू लोकसंख्या असलेले मालदा आणि नादियासारखे अनेक जिल्हे पूर्व पाकिस्तान, आता बांगलादेशला देण्यात आले.