14 जून 2022 - चालू घडामोडी आणि दिनविशेष
Type Here to Get Search Results !

14 जून 2022 - चालू घडामोडी आणि दिनविशेष

 चालू घडामोडी (14 जून 2022)

प. बंगालमध्ये मुख्यमंत्रीच कुलपती :

  • पश्चिम बंगालच्या विधानसभेने सोमवारी राज्यातील विद्यापीठांचे कुलपती मुख्यमंत्री असतील, असे विधेयक मंजूर केले.
  • त्यामुळे राज्यपाल जगदीप धनखर यांच्या जागी आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विद्यापीठांच्या कुलपती असतील.
  • राज्याचे शिक्षणमंत्री ब्रत्या बासू यांनी हे ‘द वेस्ट बेंगॉल युनिव्हर्सिटी लॉज (अमेंडमेंट) बिल-2022’ हे विधेयक विधानसभेत मांडताना सांगितले, की मुख्यमंत्री विद्यापीठांच्या कुलपती झाल्यास काहीही गैर होणार नाही.
  • 294 आमदारांच्या विधानसभेत या विधेयकाच्या बाजूने 182 मते पडली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 जून 2022)

एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स नियोजित वेळेनुसार भारताला मिळणार :

  • एकीकडे रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये युद्ध सुरु असताना भारत देशाला रशियाकडून एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम वेळेवर आणि कोणताही अडथळा न येऊ देता पुरवल्या जातील असे विधान रशियन राजदूत डेनिस अलिपोव यांनी केले आहे.
  • भारत आणि रशिया यांच्यातील राजनैतिक संबंधाला या वर्षी 75 वर्षे झाले आहेत.
  • भारताने 2018 साली एस-400 एअर मिसाईल डिफेन्स सिस्टिम्सच्या खरेदीसाठी पाच मिलियन अमेरिकी डॉलर्सचा रशियासोबत करार केला होता.
  • तर या करारांतर्गत भारताला 5 एस-400 एअर मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स मिळणार होत्या.
  • दरम्यान, रशियाने भारताल एस- 400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिमचा पहिला करण्यास मागील वर्षी डिसेंबर सुरुवात केली होती.
  • त्यानंतर मिसाईलची दुसरी तुकडी एप्रिल महिन्यात भाराताला सुपूर्द करण्यात आली होती.

आयपीएलचे टीव्ही आणि डिजिटल माध्यम हक्क दोन स्वतंत्र ब्रॉडकास्टर्सकडे :

  • इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) माध्यम हक्कांबाबत लिलाव सुरू आहे.
  • लिलावाच्या दुसऱ्या दिवशी टीव्ही आणि डिजिटल हक्क विकले गेले आहेत.
  • 2023 ते 2027 या वर्षांसाठी हे हक्क दोन वेगवेगळ्या कंपन्यांनी 44,075 हजार कोटी रुपयांना विकत घेतल्याचे म्हटले जात आहे.
  • म्हणजे आयपीएल आता टीव्हीवर वेगळ्या चॅनेलवर आणि अॅप व वेबसाइटवर दिसेल.
  • एकूण 410 सामन्यांसाठी हे माध्यम हक्क विकण्याचे आल्याची माहिती मिळत आहे.
  • समोर आलेल्या माहितीनुसार, आयपीएलचे टेलिव्हिजन हक्क सोनीला आणि डिजिटल हक्क वायाकॉमकडे (रिलायन्स) गेले आहेत.

युवा जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धात गुरुनायडू सनापतीची सुवर्णकमाई :

  • भारताच्या गुरुनायडू सनापतीने युवा जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेतील मुलांच्या 55 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली.
  • तर या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारा तो भारताचा पहिला वेटलििफ्टगपटू ठरला.
  • तसेच महाराष्ट्राच्या सौम्या दळवीने 45 किलो कांस्यपदक पटकावले.
  • तर या कामगिरीमुळे भारताने आतापर्यंत स्पर्धेत चार पदकांची कमाई केली आहे.

दिनविशेष :

  • 14 जून हा दिवस ‘जागतिक रक्त दाता दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ ‘निळकंथा सोमायाजी‘ यांचा जन्म 14 जून 1444 मध्ये झाला.
  • महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ‘अनाथ बालिकाश्रम‘ ही संस्था 14 जून 1896 मध्ये स्थापन केली.
  • भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची ‘वेव्हेल योजना‘ 14 जून 1945 रोजी जाहीर झाली होती.
  • ए.सी. किंवा डी.सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्‍या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ 14 जून 2001 मध्ये पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section