भारताचा आवाज हरपला..
फेब्रुवारी ०६, २०२२
*भारताचा सूर हरपला ! लता मंगेशकरांना दिग्गजांकडून श्रद्धांजली*
*Pawan Digital || निधन वार्ता*
😢 भारताची गानकोकिळा *लता मंगेशकर* यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
👏 या बातमीने संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरवली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज व्यक्तींनी सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
● पंतप्रधान नरेंद्र मोदी :
_*लता दीदींकडून मला नेहमीच अपार स्नेह मिळाला हा मी माझा सन्मान समजतो. लता दीदींच्या निधनाबद्दल मी माझ्या भारतीय सहकाऱ्यांसोबत शोक व्यक्त करतो.*_
● शरद पवार (राष्टवादीचे सर्वेसर्वा)
*जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!*
● राजनाथ सिंग (सरंक्षणमंत्री)
*भारताचा आवाज हरपला.*
● उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री)
*लता दीदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला असून एक महान पर्व संपले आहे. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला आहे.*
● संजय राऊत (शिवसेना खासदार):
*युग संपलं....* असं ट्विट करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
● नितीन गडकरी (केंद्रीय मंत्री):
*लता दीदी आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्थान राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.*
● किशोरी पेडणेकर (मुंबई महापौर)
*भारतीय संगीत आज पोरके झाले आहे. मूर्तिमंत संगीत हरपले आहे. मनाला तरुण करणारा त्यांचा सूर आज हरपला. आजचा दिवस दुःखद आणि वेदना देणारा आहे...'*
� *आता WhatsApp वर मिळणार MPSC, पोलीस भरती, सरळसेवा, चालुघडामोडी, न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!*
� अगदी विनामूल्य..
� त्यासाठी तुम्हाला *Pawan Digital Magazine* जॉईन करावे लागेल. जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
📱 Join Telegram
https://t.me/Pawan_Digital_Magzine
🪀 Join WhatsApp
https://cutt.ly/LICsT4e
Tags