🪙 *_रुपया_* 🪙
*Pawan Digital ll Economic*
*_भारतात चलनाचा (करन्सी) इतिहास २५०० वर्ष जुना आहे. याची सुरुवात एका राजाने केली होती. जर इंग्रजांना शक्य झाले असते, तर आज भारताचे चलन पौंड असते. परंतु रुपया मजबूत असल्यामुळे तसे होऊ शकले नाही. गोष्ट सन १९१७ मधील आहे, जेव्हा रुपया १३ अमेरिकन डॉलर च्या बरोबर होता. मग १९४७ मध्ये भरत स्वतंत्र झाला आणि 1 रुपया = 1$ करण्यात आले. पुढे हळूहळू भारतावर कर्ज वाढत गेले, तेव्हा इंदिरा गांधींनी कर्ज चुकते करण्यासाठी रुपयाची किंमत अर्धी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आजपर्यंत रुपयाची किंमत घसरतच आली आहे._*
स्वातंत्र्याच्या नंतर पाकिस्तानने तोपर्यंत भारतीय चलन वापरले, जोपर्यंत त्यांनी स्वतःच्या चालू शकणाऱ्या नोटा छापल्या नाहीत. भारताच्या व्यतिरिक्त इंडोनेशिया, मॉरीशस, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यांची देखील करन्सी रुपया आहे.
💵 *_नोटांवरील चित्र_* 💵
प्रत्येक भारतीय नोटेवर कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा फोटो छापलेला असतो. जसे *_२० रुपयांच्या नोटेवर वेरूळ कैलास लेण्यांचा फोटो आहे,तर १० रुपयांच्या नोटेवर कोणार्क येथील सूर्य मंदिर रथाच्या चाकाचा फोटो छापलेला आहे,५० रुपयाच्या नोटेवर हंपी येथील मंदिर,१०० रुपयांच्या नोटेवर गुजरात येथील राणी की वाव याचे चित्र आहे.२०० रुपयाच्या नोटेवर सांची येथील स्तूप याशिवाय ५०० रुपयांच्या नोटेवर दिल्ली येथील लाल किल्ल्याचा फोटो छापलेला आहे.तसेच २००० रुपयाच्या नोटेवर मंगळयानाचा फोटो पाहायला मिळतो._* भारतीय नोटेवर तिची किंमत १५ भाषांमध्ये लिहिली जाते. *_भारतीय नोटेवर महात्मा गांधींचा जो फोटो छापलेला असतो, तो फोटो तेव्हा काढण्यात आलेला होता, जेव्हा गांधी, तत्कालीन बर्मा आणि भारतात ब्रिटीश सेक्रेटरीच्या रुपात कार्यरत असलेल्या फ्रेडरिक लॉरेन्स याला कलकत्ता स्थित व्हाईसराय हाउस मध्ये भेटायला गेले होते.१९९६ मध्ये हा फोटो नोटांवर छापण्यास सुरुवात झाली._* त्यापूर्वी नोटेवर अशोक स्तंभ छापला जात असे.
RBI ने जानेवारी १९३८ मध्ये पहिल्यांदा ५ रुपयांची पेपर करन्सी छापली होती.ज्यावर किंग जॉर्ज - ६ चा फोटो होता.
♦️ *_सिरीयल नंबर._* ♦️
नोटांवर सिरीयल नंबर अशासाठी टाकलेला असतो, जेणेकरून रिझर्व्ह बँकेला समजू शकेल की, या क्षणी मार्केटमध्ये किती चलन आहे. *_सुरक्षा कारणांसाठी नोटांच्या सिरीयल नंबर मध्ये I, J, O, X, Y, Z ही अक्षरे नसतात._*
♻️ *_नोटांचे मटेरियल._* ♻️
भारतीय नोट सामान्य कागदाच्या नव्हे तर कॉटन पासून बनलेल्या असतात. त्या इतक्या मजबूत असतात की, नोट नवीन असेल तर तुम्ही तिच्या दोन्ही कडा पकडून ती नोट फाडू शकत नाही. *_जर तुमच्याकडे अर्ध्याहून अधिक (५१%) फाटलेली नोट असेल तरी तुम्ही बॅंकेत जाऊन ती बदलून अनु शकता._*
💴 *_५०० आणि १००० च्या नोटा._* 💵
५०० रुपयांची पहिली नोट १९८७ मध्ये आणि १००० रुपयांची पहिली नोट २००० साली बनवण्यात आली होती. सध्या त्या दोन्ही नोटा बंद झाल्या आहे. मोदी सरकारने नवीन ५०० व २००० च्या नोटा चलनात आणल्या आहेत.
🔮 *_किती नोटा छापू शकते RBI?_* 🔮
According to RBI, भारत दर वर्षी २००० करोड करन्सी नोटा छापतो. RBI स्वतःला हव्या तेवढ्या नोटा छापू शकते ? नाही, तसे नाहीये. *_RBI स्वतःला वाटेल तेवढ्या नोटा छापू शकत नाही, तर ती फक्त Rs. १०,००० पर्यंतच्या नोटा छापू शकते. जर याहून अधिक नोटा छापायच्या असतील तर तिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक्ट, १९३४ मध्ये बदल करावा लागेल._*
जर आपल्याकडे मशीन आहेत तर आपण अगणित नोटा का छापू शकत नाही? *_आपण किती नोटा छापायच्या हे मुद्रा स्फीति,जीडीपी ग्रोथ,बँक नोट्स ची रिप्लेसमेंट आणि रिझर्व्ह बँकेचा स्टॉक यांच्यावर निर्धारित होते._*
आजच्या घडीला भारतात अनेक प्रकारच्या बनावट नोटा आहेत परंतु प्रशासनाचे याकडे बारकाईने लक्ष आहे. अशा आहे की ही परिस्थती सुधारेल.
*_एके काळी भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी ० रुपयाची ची नोट 5thpillar नावाच्या बिगर सरकारी संस्थेकडून चलनात आणलेली होती. 1938 या वर्षी रु. १०,००० ची नोट देखील छापली गेली परंतु १९७८ मध्ये त्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या._*
💰 *_छपाईला किती खर्च येतो?_* 💰
एका नोटेच्या छपाईला किती खर्च येतो पाहूया.
Rs. 1= Rs.1.14
Rs.10 =Rs. 0.66Rs.
Rs.20 = Rs.0.94Rs.
Rs.50= Rs.1.63
Rs.100 = Rs.1.20
Rs 200 = Rs 2.15
Rs.500 = Rs. 3.37
Rs.2,000 = Rs 3.53
*ही माहिती जुन्या चलनाची आहे नवीन चलनात भरपूर बदल झालेले आहेत.*
🪙 *_नाणी._* 🪙
१ रुपयात १०० पैसे असतील, ही गोष्ट १९५७ साली लागू करण्यात आली होती. त्या आधी रुपया १६ आण्यांमध्ये विभागला जायचा. *_स्वातंत्राच्या नंतर तांब्याची नाणी बनत असत. त्यानंतर १९६४ मध्ये एल्युमिनियम ची आणि १९८८ मध्ये स्टेनलेस स्टीलची नाणी बनायला सुरुवात झाली._*
💮 *_५ च्या नाण्यापासून ब्लेड?_* 💮
एक वेळ अशी होती, जेव्हा बांग्लादेश ब्लेड बनवण्यासाठी भारताकडून ५ रुपयांची नाणी मागवत असे.५ रुपयांच्या एका नाण्यापासून ६ ब्लेड बनत असत. एका ब्लेडची किंमत २ रुपये होती. त्यामुळे ब्लेड बनवणाऱ्याचा चांगला फायदा होत होता. हे पाहून भरत सरकारने नाणे बनवण्याचा धातूच बदलून टाकला. *_१० रुपयांचे नाणे बनवण्यासाठी Rs. ६.१० खर्च येतो._*
⚜ *_नाण्यावर खास खूण_* ⚜
प्रत्येक नाण्यावर वर्षाच्या खाली एक खास खूण बनलेली असते, ते निशाण पाहून समजू शकते की हे नाणे कुठे बनलेले आहे.
मुंबई – हीरा [◆]
नोएडा – डॉट [.]
हैदराबाद –तारा [★]
कोलकाता – कोणतीही खूण नाही.
🔰 *_कमी खर्चात करा या देशांची सफर._* 🔰
डॉलर च्या तुलनेत रुपया नक्कीच कमजोर आहे, परंतु तरीही काही देश असे आहेत, ज्यांच्या चलना पुढे रुपया खूप मोठा आहे. तुम्ही कमी खर्चात या देशांची सफर करण्याचा आनंद लुटू शकता.
*Rs. 1 in*
नेपाळ = 1.60 नेपाळी रुपया.
आइसलैंड = 1.94 क्रोन.
श्रीलंका = 2.72 श्रीलंकन रुपया.
हंगरी ₹ = 4.14 फोरिंट.
कंबोडिया ₹ = 54.55 रियाल.
इंडोनेशिया = 192.52 इंडोनेशियन रूपया.
व्हिएतनाम = 304.04 व्हिएतनामी डॉन्ग.
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
� *आता WhatsApp वर मिळणार MPSC, पोलीस भरती, सरळसेवा, चालुघडामोडी, न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!*
� अगदी विनामूल्य..
� त्यासाठी तुम्हाला *Pawan Digital Magazine* जॉईन करावे लागेल. जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
📱 Join Telegram
https://t.me/Pawan_Digital_Magzine
🪀 Join WhatsApp
https://cutt.ly/LICsT4e
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●