■◆ अर्थसंकल्प 2022 : मोबाईलसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंबाबत काय घोषणा?
● मोबाईलसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार
● पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या रसायनांवरील आयात शुल्कात घट, इंधन स्वस्त करण्याचा प्रयत्न
● प्राप्तीकर रचनेत कोणताही बदल नाही, नोकरदारांच्या पदरी निराशा
● करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी सरकारचे पाऊल, छापेमारीत सर्वच संपत्ती जप्त करणार
● कापलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिरे, रत्नांवरील सीमा शुल्क पाच टक्क्यांपर्यंत कमी करणार
● आत्मनिर्भर भारत योजनेमुळे 16 लाख रोजगाराच्या संधी
● मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख रोजगार उपलब्ध
● पुढील आर्थिक वर्षात 9.2 टक्के विकास दर अपेक्षित आहे
● ऊर्जा, वाहतूक, विपणन यावर भर दिला जाईल
● पुढील आर्थिक वर्षात 25 हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवणार
● येत्या 3 वर्षात 400 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार
● गतीशक्ती मास्टर प्लॅनद्वारे पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार
● शहरी वाहतूक रेल्वे मार्गाशी जोडणार
● हा अर्थसंकल्प 2047 पर्यंतचा हा ब्लूप्रिंट
● विविध शहरांची गरज ओळखून मेट्रोचे जाळ उभारणार
● 'पंतप्रधान गती योजने'तंर्गत पायाभूत सुविधा उभारणार
● आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार
● 3 वर्षात 400 नवीन बुलेट ट्रेन उभारणार
● 2023 पर्यंत 25 हजार किमीचा महामार्ग उभारणार
● एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारात आणणार
■◆ अर्थसंकल्प 2022 : शालेय विद्यार्थांसाठी नेमक्या काय घोषणा?
⚡ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना काय काय मिळणार? याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
💁♂️ शालेय शिक्षण असो की उच्च शिक्षण, सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनमुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीऐवजी डिजिटल पद्धतीने अभ्यास आणि परीक्षा घेतल्या जात आहेत.
📺 त्याचबरोबर शालेय आणि उच्च शिक्षणात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची प्रक्रियाही देशात सुरू आहे. अशातच अर्थमंत्र्यांनी शालेय शिक्षणासाठी 100 चॅनेल्स सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.
💫 कोरोनामुळे देशातील छोट्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं आहे. 'वन क्लास वन टीव्ही चॅनल'द्वारे प्रयत्न केले जाणार आहेत.
🧐 शालेय शिक्षणासाठी 100 चॅनेल्स सुरू करणार. विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत शिकवणार. रेडिओ, टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.
👍 वन क्लास वन टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पहिली ते बारावीसाठी चॅनेल सुरू करणार. प्रादेशिक भाषांमध्ये हे चॅनेल काम करतील. यासाठी इंटरनेट रेडिओ आणि डिजिटल साधनांचा वापर करण्यात येईल असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.
● डिजिटल विद्यापीठ सुरू करणार असून हे विद्यापीठ देशातील प्रादेशिक भाषांमध्ये सुरू होणार आहे.
● ई कंटेन्ट तयार करण्यासाठी देशातील मोठी विद्यापीठ आणि सरकार एकत्र काम करणार असल्याचं असं देखील निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
● कोरोनाकाळात मानसिक समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे देशात 21 मानसिक समस्या समुपदेशन केंद्र सुरू करणार आहे.
● देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामधून देशात 60 लाख नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.
� *आता WhatsApp वर मिळणार MPSC, पोलीस भरती, सरळसेवा, चालुघडामोडी, न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!*
� अगदी विनामूल्य..
� त्यासाठी तुम्हाला *Pawan Digital Magazine* जॉईन करावे लागेल. जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
📱 Join Telegram
https://t.me/Pawan_Digital_Magzine
🪀 Join WhatsApp
https://cutt.ly/LICsT4e