केंद्र सरकारची शेतकरी गटांसाठी मोठी योजना!
Type Here to Get Search Results !

केंद्र सरकारची शेतकरी गटांसाठी मोठी योजना!


 *केंद्र सरकारची शेतकरी गटांसाठी मोठी योजना!*

*Pawan Digital | Govt.Schemes*
⚡ पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन आणि आर्थिक मदत देण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना (पीएम किसान फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन) सुरू केली आहे.
👉 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून १५ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे. याचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक छोटेसे काम करावे लागेल. त्यानंतर शेतकरी पीएम किसान एफपीओ योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
🤔 *कशी मिळेल १५ लाख रुपयांची मदत* :
● यासाठी ११ शेतकऱ्यांनी मिळून गट, एक संस्था किंवा कंपनी बनवायची आहे. त्यानंतर सरकारकडून संस्थेला १५ लाख रुपयांची मदत दिली जाते. ज्याद्वारे शेतकरी कृषी उपकरणे किंवा खते, बियाणे किंवा औषधे खरेदी करू शकतात.
● पीएम किसान शेतकरी उत्पादक संघटना योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला https://www.enam.gov.in/web/ पोर्टलवर तुमचे लॉगिन करावे लागेल. त्यानंतरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
💻 *लॉग-इन आयडी कसा बनवायचा?*
● पहिल्यांदा राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइट https://www.enam.gov.in/web/ वर जा.
● होम पेजवर एफपीओ (FPO) च्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर फॉर्म उघडेल, तो भरा.
● त्यानंतर वापरकर्त्याचे नाव (यूजरनेम) आणि पासवर्डसह कॅप्शन कोड प्रविष्ट करा. यासह तुमचे लॉग-इन तयार होईल
📝 *या योजनेसाठी अर्ज कसा करावा?*
● सर्वात आधी राष्ट्रीय कृषी बाजाराच्या https://www.enam.gov.in/web/ वेबसाइटवर जा.
● होम पेजवर स्टेक होल्डर्स पर्यायावर कर्सर नेल्यानंतर तुम्हाला एफपीओचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
● त्यानंतर रजिस्ट्रेशनच्या पर्यायावर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरा.
● यानंतर स्कॅन केलेले पासबुक किंवा रद्द केलेला चेक (कॅन्सल चेक) आणि आयडी प्रूफ अपलोड करा.
● त्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.

 📍 टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

� *आता WhatsApp वर मिळणार MPSC, पोलीस भरती, सरळसेवा, चालुघडामोडी, न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!*
� अगदी विनामूल्य..
� त्यासाठी तुम्हाला *Pawan Digital Magazine* जॉईन करावे लागेल. जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

📱 Join Telegram
https://t.me/Pawan_Digital_Magzine

🪀 Join WhatsApp
https://cutt.ly/LICsT4e

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section