◆> इयत्ता १२ वीच्या मूल्यांकनाचा फॉर्म्युला ठरला; सीबीएसई नियुक्त समितीची सर्वोच्च न्यायालयात माहिती..
Type Here to Get Search Results !

◆> इयत्ता १२ वीच्या मूल्यांकनाचा फॉर्म्युला ठरला; सीबीएसई नियुक्त समितीची सर्वोच्च न्यायालयात माहिती..

 ..


📢 इयत्ता १२ वीच्या मूल्यांकनाचा फॉर्म्युला ठरला; सीबीएसई नियुक्त समितीची सर्वोच्च न्यायालयात माहिती

👍 विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसई इयत्ता १२ वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. सीबीएससीने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केला आहे. 


🧮 काय आहे मूल्यांकनाचा फॉर्म्युला ?


★ इयत्ता १० वी, ११ आणि इयत्ता १२ वीत विद्यार्थ्यांच्या शालेय कामगिरीच्या आधारे १२ वीचा निकाल जाहीर केला जाईल.


★ विद्यार्थ्यांची इयत्ता दहावीतील शालेय कामगिरीचे मूल्यांकन करीत ३० टक्के, ११ वी तील कामगिरी आधारे ३० आणि इयत्ता बारावीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीच्या आधारे ४० टक्के देण्यात येतील.


★ 10वी, 11वी चे गुण पाहताना ते 5 पैकी 3 सर्वोत्तम गुणांच्या विषयांचे ग्राह्य धरले जाणार आहेत.


♟️अद्याप सीबीएससी बोर्डाने 12वी निकालाची तारीख जाहीर केलेली नाही पण वेणूगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आता हा 12वीचा 31 जुलै पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.


🎯 दरम्यान अ‍ॅटर्नी जनरल वेणूगोपाल यांनी कोर्टात माहिती देताना जे विद्यार्थी या फॉर्म्युला नुसार जे विद्यार्थी या फॉर्म्युला नुसार मिळालेल्या मार्क्स ने खुष नसतील त्यांना श्रेणी सुधारण्यासाठी कोविड स्थिती सुधारल्यानंतर होणारी परीक्षा देता येईल

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section