>> ठळक बातम्या ११.०४.२०२१
Type Here to Get Search Results !

>> ठळक बातम्या ११.०४.२०२१

  •  राज्यात 'या' करोना चाचणीसाठी नागरिकांना मोजावे लागतात ४,५०० रुपये : राज्य सरकारने ३१ मार्चला करोनाचाचणीचे कमाल दर निश्चित केले. त्यानुसार आरटी-पीसीआर चाचणीसाठी तीन वेगवेगळ्या चाचणीचे ५०० ते ८०० रुपये असे दर आहेत. तर रॅपिड अँटिजेनसाठी १५० ते ३०० रुपये, असे कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत. परंतु, या दोन चाचण्यांखेरीज तिसरी चाचणीदेखील असून ती राज्य सरकारकडून दुर्लक्षित राहिली आहे. 
  •  आरोग्याची आणीबाणी, आधी जीव वाचवावे लागतील!; मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत घेणार मोठा निर्णय: राज्यातील करोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनवर सर्वांची मते जाणून घेण्यात आली. यावेळी तज्ज्ञांचा हवाला देत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर अंतिम निर्णय मात्र झाला नसून उद्या किंवा परवा लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने पोटच्या मुलाचा आई-वडिलांकडून खून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे एका तरुणाने कुटुंबीयांच्या विरोधात जावून प्रेम विवाह केल्याच्या रागातून त्याच्या आई-वडिलांनी त्याचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर तरुणाच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश प्रताप कुमावत (रा. कैलास नगर, भुषण मंगल कार्यालय, चाळीसगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
  • धक्कादायक: सलाईनच्या नळीने गळा आवळून कोविड रुग्णाची आत्महत्या : अकोला शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका करोना बाधित रुग्णाने सलाईनच्या नळीने गळा आवळून जीवन संपवले असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
  • IPL 2021 : धोनीच्या चेन्नईला पहिल्याच सामन्यात मोठा धक्का; पृथ्वी-धवनची अर्धशतके आणि दिल्लीचा मोठा विजय : चेन्नईने दिल्लीपुढे विजयासाठी यावेळी १८९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचे पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या दोघांनीही चेन्नईच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी अर्धशतके झळकावत संघाचा विजय सुकर केला.
  • राज्य सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या आठवडाअखेरच्या लॉकडाउनला म्हणजेच विकेंड लॉकडाउनला शुक्रवारी रात्रीपासून सुरुवात झाली. तो सोमवारी सकाळपर्यंत लागू असेल. राज्यात नागरिकांकडून लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section