◆ ठळक बातम्या...०५.०४.२०२१
Type Here to Get Search Results !

◆ ठळक बातम्या...०५.०४.२०२१

 


📍 *चालू घडामोडी*📍


 〽️ *4 एप्रिल 2021*〽️


⚡राज्यात आज दिवसभरात तब्बल 49 हजार 447 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 277 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


✨राज्यात आज 37 हजार 821 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत 24 लाख 95 हजार 315 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. 


👉🏻 राज्यात एकूण 401172 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.49 टक्के आहे.


🙌🏻तसेच मुंबईत आज दिवसभरात तब्बल 9 हजार 90 तर पुणे जिल्ह्यात 5 हजार 720 तर पिंपरी चिंचवड मध्ये 2 हजार 905 तर अहमदनगर जिल्ह्यात 1 हजार 996 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.


*👫🏻पहिली ते आठवीचे विद्यार्थी परीक्षाविना थेट पास होणार*


🖋️राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार आहे. 


🖋️या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.


🖋️शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची महत्त्वाची घोषणा केली.


🖋️राज्यात कोरोनाची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. पहिली ते आठवी वार्षिक मूल्यमापन याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. 


🖋️ गेल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगल या माध्यमातून आपण शिक्षण सुरु ठेवलं. 


🖋️ खरतर पहिली ते चौथीच्या शाळा सुरु झाल्या नाहीत. तर पाचवी ते आठवी या शाळा सुरु झाल्या. 


🖋️पण काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले नाही. विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावे असा प्रयत्न होता. 


🖋️ पण सध्या कोरोनाची स्थिती पाहता पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. 


🖋️ त्यात या विद्यार्थ्याने कशाप्रकारे अभ्यास केला हे बघितले पाहिजे. पण आताची परिस्थिती बघता हे यावर्षी होण शक्य नाही. 


🖋️राज्यातील जे पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे.


*💉राज्यात लवकरच दररोज अडीच लाख चाचण्या केल्या जाणार - मुख्यमंत्री*


🖋️राज्यात मागील काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाचित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे.


🖋️ या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जात आहे, मात्र तरी देखील रूग्णसंख्या अटोक्यात येत नसल्याने आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागतो की काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


🖋️या पार्शअवभूमीवर आज राज्यातील करोना परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला ऑनलाईन संबोधित केलं. 


🖋️यावेळी त्यांनी राज्यातील चाचण्यांची संख्या वाढवून दररोज अडीच लाख चाचण्या सुरू केल्या जाणार असल्याचे सांगितले.


🖋️मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, " हा विषाणू वेगवेगळे अवतार धारण करून आपल्याला संकटात टाकतो आहे आणि आपली परीक्षा बघतो आहे.


🖋️आपल्या सर्वांना धैर्याने लढण्याची आवश्यकता आहे. लॉकडाउन करणार का? या प्रश्नाचं मी अजूनही उत्तर देत नाही. पण साधारण आताची परिस्थिती काय आहे, याची कल्पना आपल्याला देण्याची मला पुन्हा एकदा गरज वाटते."


*🌡️सामूहिक लसीकरणाची केजरीवाल यांची सूचना*


🖋️ करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर लसीकरण करावे लागणार असून त्यासाठी सामूहिक लसीकरण हाच योग्य पर्याय आहे. 


🖋️त्यामुळे केंद्र सरकारने ४५ वर्षांची अट काढून टाकली पाहिजे तसेच, बिगर आरोग्यकेंद्रांवरही लसीकरणाची प्रक्रिया राबवली गेली पाहिजे, अशी सूचना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केली. 


🖋️दिल्लीत रुग्णसंख्या वाढत असली तरी टाळेबंदीची शक्यता मात्र केजरीवाल यांनी फेटाळली.


🖋️ देशभर करोनाची दुसरी लाट आल्याचे मानले जात असून केंद्र सरकारनेही राज्यांना लसीकरणा ला वेग देण्याची तसेच मध्यमवयीन व्यक्तींच्या लसीकरणावर भर देण्याची सूचना केली आहे. 


🖋️शिवाय, सर्वाधिक करोनाबाधित जिल्ह्यापार्श्वत दोन आठवड्यांमध्ये ७५ टक्के लोकांचे लसीकरण करण्याचाही सल्ला दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी सामूहिक लसीकरणाची मागणी केली आहे.


*✒️संक्षिप्त बातम्या*


● देशात लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर; राज्यातील 70 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण


● जुन्नर येथे कोरोना नियमांचे उल्लंघन; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल


● मुंबईतील माटुंग्याच्या शोभा हॉटेलमध्ये कोरोनाचा विस्फोट; 11 कर्मचार्‍यांना लागण, हॉटेल सील


● सध्याच्या वातावरणात आम्ही भारताशी व्यापारी संबंध ठेऊ इच्छित नाही - पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांचे वक्तव्य


● देशात कोरोना विषाणू उद्रेक होत असताना, पीएम नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी पूर्ण केल्या 23 सभा


● ओडिशा विधानसभेत रणकंदन; भाजपच्या आमदारांकडून अध्यक्षांच्या आसनाकडे चप्पल, ईअरफोन व कागदे फेकल्यामुळे उडाला गोंधळ 


● शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- राहुल गांधी


● Aprilia SXR 125 भारतात लवकरच होणार लॉन्च, फक्त 5 हजार रुपयांत करता येणार बुकिंग


● "मला विराट, रोहितची फलंदाजी आवडते; पण पंतनं मला वेड लावलंय", गांगुलीची स्तुतीसुमनं


● लोकप्रिय मालिका 'जीव झाला येडापिसा' 535 भागांचा टप्पा पूर्ण करुन घेणार रसिकांचा निरोप

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

👬 *हि माहिती मित्रांना पण शेअर करा*

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section