ताज्या घडामोडी ०४.०४.२०२१
एप्रिल ०४, २०२१
मिशन बिगीन अगेन:औरंगाबादमध्ये ३०
एप्रिलपर्यंत संचारबंदी कायम: राज्य शासनाच्या आदेशानुसार "मिशन बिगीन अगेन" अंतर्गत
औरंगाबाद जिल्ह्यात संचारबंदीचा कालावधी वाढविण्यात आलेला असून मनाई आदेश ३०
एप्रिलपर्यंत कायम राहणार आहेत. त्यानुसार रात्री आठ ते सकाळी सात रोजी या
कालावधीसाठी संचारबंदी आदेश लागू राहणार आहे.
सचिन वाझेंच्या कोठडीत ७ एप्रिलपर्यंत
वाढ, फास आणखी आवळणार?: एनआयएच्या विशेष
कोर्टाने सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. मिठी
नदीतून सीसीटीव्ही डेटा मिळाला असून वाझे यांच्या पासपोर्टची चौकशी देखील व्हायची
आहे. यामुळे एनआयएने वाझे यांच्या एनआयए कोठडीत वाढ करण्याची मागणी केली.
परभणीत शेतकऱ्याची आत्महत्या, बँकेचे होते डोक्यावर कर्ज: ताडकळस येथे एका
तरूण शेतकऱ्याने शेतातील नापिकीमुळे बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून
स्वतः च्या राहत्या घरी छताच्या पंख्याला दोरीचा गळफास घेऊन आत्महत्या केली. या
प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह केले
आणि कोसळला कांद्याचा भाव: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक
लाईव्हद्वारे संभाव्य लॉकडाऊनचा इशारा दिल्यामुळे कांद्याचे भाव पडले आहेत. याचा
परिणाम कृषीमालाच्या बाजारात अस्थिरता निर्माण होण्यावर झाली आहे.
धक्कादायक… Game of Thrones च्या निर्मात्याची हत्या; चहामधून देण्यात आलं विष ते ७६ अब्ज ६० कोटी रुपये इतक्या संपत्तीचे मालक होते
कर्नाटकमध्ये गोहत्या प्रतिबंधक विधेयक
मंजूर, सात
वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद
नवं विधेयक कडक
शिक्षेच्या तरतुदींमुळे ठरलं होतं वादग्रस्त
“कृषी
क्षेत्रात सुधारणा होऊ नयेत यासाठी मनमोहन सिंग, शरद
पवारांवर होता दबाव” कृषी मंत्री तोमर यांची माहिती.
जाता जाता… विमानतळाला
स्वत:चं नाव देण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा विचार
लवकरच ट्रम्प
यांचा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार.
चीनने निर्माण केली जगातील सगळ्यात मोठी
पानबुडी, वाचा अधिक खालील लिंक वर.
https://pawandigitalservice.blogspot.com/2021/04/blog-post_4.html
Join on Telegram: https://t.me/pawanacademyambad
अशीच
माहिती मिळवा Whatsapp वर. यासाठी लिंक उघडून Join Whatsapp करा.
https://cutt.ly/5clQqcN
Tags