“ … त्याशिवाय पतंजलीच्या ‘कोरोनिल’ विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही”....
Type Here to Get Search Results !

“ … त्याशिवाय पतंजलीच्या ‘कोरोनिल’ विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही”....

 “ … त्याशिवाय पतंजलीच्या ‘कोरोनिल’ विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही”

न्यू पवन करिअर अकॅडमी, अंबड 

करोना संसर्गावरील उपचारासाठी कोणत्याही पारंपरिक औषधाला मान्यता दिली नसल्याचे खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेच स्पष्ट केल्यामुळे ‘कोरोनिल’ औषधाला जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणिकरणानुसार आयुष मंत्रालयाने मान्यता दिल्याचा पतंजली आयुर्वेद कंपनीचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील “सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही.” असं स्पष्ट केलं आहे.


“पतंजलीच्या कोरोनिल औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रश्न उपस्थित केले असून, जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे औषध करोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणण आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही.” असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.


आता बातम्या, महिती आणि खूप काही मिळवा  whatsapp वर ते अगदी मोफत... त्यासाठी खालील  लिंक ओपन करून नोंदणी करा.

*https://bit.ly/3bnamVn*

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section