🧐 *ताज हॉटेल मध्ये सात दिवस मोफत राहण्याची सोय; व्हॅलेंटाईन डे शी संबंधित हा मेसेज तुम्हालाही आला आहे? जाणून घ्या तथ्य!*
❤️ फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना! 7 फेब्रुवारी पासून व्हॅलेंटाइन वीक ला सुरुवात होते. प्रेमीयुगल एकमेकांना सरप्राईज देण्यात व्यस्त होऊन जातात. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यासाठी आणि आपल्या जोडीदाराला विशिष्ट गिफ्ट देण्यासाठी मेहनत घेत असतात.
🤨 अशा विविध इवेंट चा फायदा घेऊन अनेक फेक न्युज पसरवणारे लोक आजूबाजूला तुम्हाला दिसतील.
📱 सध्या सोशल मीडियावर अनेकांना ताज हॉटेलमध्ये सात दिवस मोफत राहण्याचे कूपन मिळणार असल्याचे मेसेजेस जात आहेत.
💁♀️ व्हॅलेंटाईन वीक मध्ये ताज हॉटेलने खास 200 गिफ्ट कार्ड काढून ऑफर काढल्याचे या मेसेज मध्ये सांगण्यात येते. त्यानंतर कुपन वर स्क्रॅच करून ते गिफ्ट कार्ड मिळवण्याची संधी तुम्हाला आहे, असे त्या मेसेजमध्ये सांगण्यात येते.
🤦🏻♀️ व्हॉट्सॲप वर या मेसेज ने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यातून, अनेक जण गैरसमज करून घेत आहेत.
👍 मात्र, ताज हॉटेल ने स्वतःच्या ट्विटर अकाउंट वरून याबाबत खुलासा केला आहे. असा कोणताही मेसेज किंवा कोणतीही ऑफर आम्ही दिलेली नाही. त्यामुळे ग्राहकांनी सावध रहावे अशा आशयाचे आवाहनही त्याद्वारे करण्यात आले आहे.
ℹ️ अशा कोणत्याही मेसेजला बळी पडू नका. कोणत्याही प्रकारे फसवले जाऊ नका. सावध राहा आणि सतर्क राहा. तुम्हाला असा मेसेज आला तर त्याकडे दुर्लक्ष करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖